If you cannot read Marathi, please refer to the English text at the bottom.
सभासत्वाची वर्गणी आगामी वर्षातील कार्यक्रम व इतर खर्च विचारात घेऊन दरवर्षी कार्यकारिणी समिती ठरविते. सभासदत्व ऐच्छिक असले तरी सभासदांना अनेक कार्यक्रमात सवलत दिली जाते. काही कार्यक्रम (उदाहरणार्थ, गणेशोत्सव) मोफत ठेवले जातात.
जानेवारी २०२६- डिसेंबर २०२६ साठी खालील दर निश्चित केले आहेत.
प्रौढ व्यक्ती साठी - $७५
मुले
वयोगट १२ ते १८ - $५०
वयोगट ३ ते ११ - $३५
कॉलेज विदयार्थी - $५०
वार्षिक वर्गणी परत करण्यात येत नाही आणि अहस्तांतरणीय आहे.
सभासदत्वाचा फायदा काय?
मंडळाचे सभासद व्हायचे का नाही हा खरे तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सभासद होऊन व कार्यक्रमाला उपस्थित राहून मंडळाप्रती असलेली आपुलकी/स्नेह तुम्ही दाखवता. लॉस एंजेलिस परिसराचा परीघ मोठा असल्याने सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे सर्वाना शक्य होत नाही याची आम्हाला जाणीव आहे. शेवटी काय भारताच्या एका प्रांतातून आलेली फक्त भाषेमुळे जोडली गेलेली आपण मंडळी! आपण मंडळ चालवतो, एकत्र येतो, सण साजरे करतो ते कशासाठी? तर आपली संस्कृतीशी नाळ पूर्णपणे तुटू नये, आपल्या पुढच्या पिढीला ती समजावी, भाषा जमेल तितकी अवगत व्हावी किंबहुना आपलीशी वाटावी म्हणून. त्यामुळे सभासदत्वाचे पैसे देऊन मला काय मिळेल किंवा त्याचे मूल्य ("value for money") काय असे प्रश्न काहीप्रमाणात गौण ठरतात. आपले आर्थिक गणित आणि सभासदत्वाने मला काय मिळेल हे ज्याचे त्याने ठरवावे.
मंडळातर्फे वर्षभरात साधारणपणे खालील कार्यक्रम आखले जातात. यातील ठळक अक्षरातील
कार्यक्रम नक्की केले जातात व उर्वरित हे समितीवर अवलंबून असतात.
* गणेशोत्सव
* कोजागिरी पौर्णिमा
* दिवाळी
* संक्रांत
* गुढीपाडवा
* सहल
* मराठी नाटक / चित्रपट
* मराठी सांगितीक कार्यक्रम
* आनंद मेळा
Membership dues are determined each year by the Executive Committee considering the programs planned that year. MMLA members get discount for every event organized by MMLA. Some programs (e.g. Ganeshotsav) are free for MMLA members. The rates for January 2026 - December 2026 are as follows:
Adult Membership- $75
Kids Membership age 3-11yrs - $35
Youth 12-18yrs - $50
Full Time Student - $50(ID required)
MMLA membership fees is not refundable and cannot be transferred. Some programs organized by MMLA require separate fee to cover costs for facility rental, artist fee etc.
As mentioned above, membership is just a token and it provides connection to the organization and community. There is a difference in prices for various MMLA events for members and non-members.
MMLA Treasurer
c/o Darshana Joglekar, 4214 Cathann St Torrance CA 90503. If you are adding family membership, please include family names as well for our record.