नमस्कार मंडळी,
कृत्रिमप्रज्ञा (artificial intelligence - AI) किंवा सर्जनशील कृत्रिमप्रज्ञा (generative AI) हे सध्या सर्वत्र ऐकायला येणारे शब्द. तर हे AI चं तंत्रज्ञान नक्की काय आहे? त्याची निर्मिती कशी होते? त्याचा वापर कसा शिकून घ्यायचा? AI मुळे नजीकच्या भविष्यात कोणत्या आर्थिक, सामाजिक, नैतिक समस्या उद्भवू शकतील? AI ला काही मर्यादा आहेत, की या तंत्रज्ञानात खरंच स्थिरचर व्यापून दशांगुळे उरण्याची क्षमता आहे? या आणि अशाच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, मराठी भाषिकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शनिवार, २२ जूनला महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिसने ‘AI करेल ना बे’ या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे.
तर मग वाट कसली बघताय? २२ जूनला AI बद्दल गप्पा मारायला भेटायचं ना बे? कार्यक्रमाआधी तुमचे प्रश्न खालील QR code अथवा लिंक वापरून आमच्यापर्यंत पोचवा. कार्यक्रमातही काही प्रश्न विचारायला संधी मिळेल. त्वरा करा मर्यादित जागा उपलब्ध.
मुख्य सहभागी: Ashish Mahabal, Anurag Mairal, Jyotirmoy Deshmukh, Supriya Joshi, and Sagar Sabade.सहाय्यक: Gautam Pangu, Abhijit Mahabal, Sameer Sarvate, Kartik Gupte, Anu Mahabal, Anvita Ambardekar, Nikhil Joshi.स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, 201 W Ash St, Brea, CA 92821तारीख: शनिवार २२ जून २०२४वेळ: संध्याकाळी २:३० ते ४:००
धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजेलिस
Web Feedback | 8547 Attica Dr, Riverside, CA 92508
MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductible. Our federal tax id is:- 68-0538817