दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस गणेशोत्सवासाठी सज्ज होत आहे. हा कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू फक्त धार्मिक नसून मराठी कुटुंबांमध्ये जवळीक निर्माण करण्याचा आहे. तर मंडळी, मंडळातर्फे आम्ही आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं गणेशोत्सवासाठी [दिनांक: १० सप्टेंबर २०११] स्वागत करतो.
म्हणूनच मंडळ आपल्या सर्वच सभासदांना आर्थिक मदतीसाठी आणि सहकार्याची हाक घालत आहे. मदतरूपी कोणतीही रक्कम आम्हास नवनवीन कामे करण्यास आणि तुम्हाला सर्वांगी मराठी मनोरंजन देण्यास उत्स्फुर्त करेल. अजून महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र मंडळला non-profit 501 3(c) status मिळाला आहे त्यामुळे तुम्हाला tax वाचवता येईल. गणेश उत्सवासाठी येणारे खर्च तुम्ही स्वतः, दोन किवा दोनहून अधिक कुटुंब एकत्र येऊन sponsor केल्यास हा कार्यक्रम अजून दर्जेदार करता येईल. कृपया नोंद घ्यावी की जे sponsors १७ ऑगस्टच्या आधी मंडळाशी संपर्क साधतील त्यांची नावे मंडळातर्फे प्रदर्शित होणाऱ्या पुस्तिकेमध्ये छापली जातील.
कुठलेही प्रश्न किवा सूचना असल्यास आम्हाला नक्की दूरध्वनी अथवा email करून कळवा.